उस्मानाबाद/प्रतिनिधी-
विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना आपला जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहे. ही समाधानाची बाब असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मी आपणा सर्वांना देतो,असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री श्री.शंकरराव यशवंतराव गडाख यांनी आज येथे केले.
येथील श्री. तुळजाभवानी क्रक्रीडा संकुल येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या सन्माननीय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी,पत्रकार बांधव आणि नागरिक बंधू-भगिनींना सर्वप्रथम पालकमंत्री श्री. गडाख यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे,कार्यकारी अभियंता अनिल सगर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी श्री. रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी आंधळे,जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे, उप कार्यकारी अभियंता श्री.गपाट,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी,जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, तहसिलदार श्री.गणेश माळी, राजकुमार माने, उपकार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,जिल्हा क्रक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, नायब तहसिलदार संतोष पाटील, चेतन पाटील, ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे,अनिल खोचरे,सतीश सोमाणी,स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागाचे प्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.गडाख यांनी आपल्या भाषणातून 26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली. खेडयांकडे चला असा संदेश देणारे व श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. तसेच, लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी केलेल्या 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. हे लक्षात घेता यापुढील होणा-या सर्व निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानाचा हक्क बजावावा, असे उपस्थिताना आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही भारतीय लोकशाहीचा प्राण आहे. राज्य घटनेतील मुलभूत तत्वे, मुलभूत अधिकार व कर्तव्ये यांचा शालेय जीवनापासून परिचय व्हावा यासाठी शासनाने सार्वभौमत्व संविधानाचे-जनहित सर्वांचे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येत आहे.
पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले,नीती आयोगाने देशातील 117 मागास जिल्ह्यांच्या कालबध्द विकासासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश आहे. जिल्हयातील मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, कृषी व कौशल्य विकास यांच्यावर भार देण्यात येत आहे. मागील 2 वर्षात राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे ऑक्टोबर, 2019 मध्ये आर्थिक समावेशन व कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये उस्मानाबाद जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकावून रुपये 3 कोटींचे बक्षीस जिंकले आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून अतिरिक्त निधी मिळत असला तरीही मागास जिल्ह्यांच्या यादीमध्ये उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश असणे ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला विकासपथावर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.
उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. सन 2019-20 या वर्षासाठी रुपये 500 कोटींच्या निधीची तरतूद मंजूर असून प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटीबध्द आहे,असे सांगून श्री.गडाख म्हणाले,कायम दुष्काळाच्या झळा सहन करणा-या मराठवाडयातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची संपविण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. यामध्ये लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्हयांतील ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या व जलशुध्दीकरण केंद्र या कामांसाठी रुपये 3 हजार 122 कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. यापैकी उस्मानाबाद जिल्हयासाठी रुपये 1 हजार 409 कोटी उपलब्ध होणार आहेत.
पशुसंवर्धन विभागाचा उल्लेख करून श्री.गडाख म्हणाले की, बळीराजा चेतना अभियानांतर्गत एकूण 900 त्रस्त कुटुंबांना 10 शेळया 01 बोकड यांचे गट वाटप केले आहेत. जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानावर 195 विधवा महिलांना व 15 अपंग लाभाथ्र्याना शेळीगटाचा लाभ दिला आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रसिध्द असलेल्या व आपल्या जिल्हयाची ओळख असलेल्या उस्मानाबादी शेळीच्या जातीसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमातून भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. लवकरच उस्मानाबादी शेळीच्या जातीला भौगोलिक मानांकन मिळेल आणि ही जात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाईल.
उस्मानाबादची कुमारी निकीता पवार ही खो-खो खेळाडू नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी असलेल्या संघास सूर्वणपदक प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 6 खेळाडूंनी आसाम मधील गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया या क्रक्रीडा स्पर्धेत खो-खो या खेळात सहभागी होवून सांघिक सूवर्णपदक प्राप्त केले आहे. शालेय राष्ट्रीय तलवारबाजी क्रक्रीडा स्पर्धेत विश्वजीत विजयकुमार कुलकर्णी या उस्मानाबादच्या खेळाडूला सूवर्णपदक व संघास कास्य आणि रौप्यपदक प्राप्त झाले आहे,या यशाचा उल्लेख करून पालकमंत्री श्री.गडाख यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे आपल्या जिल्हयाचे नाव देशपातळीवर उंचावले गेले आहे. अशा प्रकारे, क्रक्रीडा व कला, साहित्य क्षेत्रातही उस्मानाबाद जिल्हा मागे नाही, हे सिध्द झाले आहे,याबद्दल येथील खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे, कलाकारांचे व साहित्यिकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो,असे गौरवोद्गार काढले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेविषयी बोलताना श्री.गडाख यांनी शेतकरी बांधवाना आवाहन केले की, महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून रूपये 2 लाखापर्यंत पिक कर्जाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.या योजनेत उस्मानाबाद जिल्हयातील 83 हजार 880 शेतक-यांना 560 कोटी 80 लाख रुपये रक्कमेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज घेण्यास पात्र करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेवून या योजनेचा लाभ घ्यावा.
कृषी विभागामार्फत राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या चार वर्षात 664 गावांमध्ये घेण्यात आलेल्या 44 हजार 746 कामांवर रुपये 363 कोटी निधी खर्च करण्यात आला असून त्यातून 1 लाख 72 हजार टी.सी.एम. एवढा संरक्षित पाणीसाठा निर्माण झालेला असून 1 लाख 97 हजार हेक्टर इतके संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत झाली आहे.तसेच मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत सन 2016-17 व 2017-18 या वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यास 3 हजार 700 शेततळयांचा लक्षांक दिलेला असून त्यापैकी 3 हजार 704 कामे पूर्ण झालेली आहेत. या योजनेवर रुपये 15 कोटी 59 लक्ष निधी खर्च झालेला आहे. पूर्ण झालेल्या शेततळयांमुळे 7 हजार 333 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला असुन 10 हजार 267 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे. मृद आरोग्य पत्रिका अभियानातून सन 2016-17 ते 2019-20 मध्ये 7 लाख 48 हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले असून या गावांमध्ये मृद आरोग्यपत्रिकेवर पिक प्रात्यक्षिकेही आयोजित करण्यात आली आहेत,असे सांगून पालकमंत्री गडाख यांनी जिल्हयातील 42 महसूल मंडळामध्ये मंजुर झालेली सर्व स्वंयचलित हवामान केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत जिल्हयातील 287 गावांची निवड केली आहे. या प्रकल्पांतर्गत आजअखेर वैयक्तिक लाभाच्या बाबीसाठी 55 हजार 523 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 17 हजार 525 वैयक्तिक अर्जांना पूर्वसंमती दिली असून 2 हजार 509 शेतक-यांची रुपये 607 लक्ष अनुदान रक्कम आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात जमा केली आहे,अशी माहिती दिली.
पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत सन 2018-19 च्या खरीप हंगामात 7 लाख 73 हजार 335 शेतक-़्यांना रुपये 558 कोटीची विमा रक्कम मिळालेली असून सन 2019-20 च्या खरीप हंगामात जिल्हयातील 11 लाख 56 हजार 682 शेतकऱ्यांनी रुपये 415 कोटींचा विमा हप्ता भरलेला आहे. सदर बाबींचे माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.सन 2018-19 च्या रब्बी हंगामात 1 लाख 77 हजार 112 शेतकऱ्यांना रुपये 61 कोटी रुपयांची विमा रक्कम प्राप्त झालेली आहे, असे सांगून श्री.गडाख यांनी माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर, 2019 मध्ये अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई म्हणून रुपये 249 कोटी वाटप करण्यात आलेले असून उर्वरित रुपये 53 कोटी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्हयातील 2 लाख 34 हजार 271 शेतक-यांच्या बँक खात्यात विहीत हप्त्याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येत आहे, असे आपल्या भाषणात नमूद केले.
शासनाच्या शिवभोजन योजनेच्या शुभारंभाविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. उस्मानाबाद शहरात शिवदिप उपाहारगृह,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
नीती आयोग व बेटी बचाव-बेटी पढाव अंतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे मागील पाच वर्षाच्या तुलनेमध्ये लिंग गुणोत्तर दर दर हजारी 911 वरुन 930 पर्यंत वाढलेले आहे असे सांगून श्री.गडाख म्हणाले,उस्मानाबाद जिल्हा स्वच्छ सर्वेक्षणात ग्रामीण भागातून बाराव्या स्थानी असून जिल्ह्यात 15 हजार स्वच्छतागृहांसाठी रुपये 18 कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 43 हजार 784 कुटुंबांचा सर्वेक्षणात सहभाग होता, त्यापैकी 11 हजार 906 कुटुंबांना रुपये 18 कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले.
आपल्या भाषणाच्या शेवटी पालकमंत्री श्री.गडाख यांनी जिल्हयाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी शिस्तीचे, कायदा व सुव्यवस्थेचे पाईक होवून, एकजुटीने काम करू या! असे आवाहन करून पुनश्च: एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या समारोहाच्या निमित्ताने पालकमंत्री श्री.गडाख व उपस्थित मान्यवराच्या हस्ते ‘उस्मानाबाद, सांस्कृतिक ओळख’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले व त्यानंतर उद्योग खात्यामार्फत मे.बालाजी इंडस्ट्रीज,प्लॉट नं.7 एम.आय.डी.सी.उमरगा, प्रो.श्री.बालाजी बलभीमराव पवार उत्पादने-ए-ए.सी ब्लॉक,मे. डी.आर.पॅकर्स, गट नं.-803 उपळा (मा) ता.जि. उस्मानाबाद,प्रो.श्री.अमित दिनानाथ घोगरे उत्पादने- कोरेगेटेड बॉक्सेस व शीटस या
लघु उद्योजकांना सन 2018 साठी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एक किंवा दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीना रक्कम रूपये 25000 मुदत ठेव शासनाकडून मंजूर झाल्याने सौ.श्र्रुती सुहास कुलकर्णी रा.काटी ता. तुळजापूर,सौ.ज्योती शरणाप्पा खजुरगे रा.सराटी पो.केशेगाव ता. तुळजापूर,सौ.सविता महेश स्वामी रा. येणेगुर ता. उमरगा यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
यानंतर उस्मानाबाद जिल्हा रायफल असोसिएशन यांचा लोकराज्य संस्था म्हणून पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला.या संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद मधील विद्यात्र्यांना इंग्रजीची आणि शासनाच्या योजनांची उत्तम ओळख व्हावी, म्हणून शासनाचे इंग्रजीतील मुखपत्र महाराष्ट्र अहेड या अंकाचे सभासदत्व स्वीकारुन संस्था लोकराज्यमय केले, त्याबद्दल त्यांच्या संस्थेला लोकराज्यसंस्था म्हणून गौरविण्यात आले. यानंतर सन 2019-20 मध्ये नेपाळ काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई खो- खो क्रक्रीडा स्पर्धेत सूवर्णपदक प्राप्त भारतीय संघाची खेळाडू कुमारी. निकीता चंद्रधर पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद आणि जिल्हा क्रक्रीडा संकुल, लातूर येथे झालेल्या राज्य युवा महोत्सव क्रक्रीडा स्पर्धेत धनंजय शिंगाडे बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांनी 15 ते 19 या वयोगटातील लोकनृत्य स्पर्धेत सूवर्णपदक प्राप्त केल्याबददल पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रजासत्ताक दिनी आयोजित संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक श्री.विशाल खांबे यांनी केले तर सेकंड इन कमांडर म्हणून राखीव पोलीस निरीक्षक श्री. शांताराम वाघमोडे यांनी जबाबदारी पार पाडली.
या संचलनात पोलीस पुरुष प्लाटून कमांडर श्री. संदीप मोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सज्जन वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक, दंगल नियंत्रण पथक श्री. मजीद शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. शकील शेख पोलीस उपनिरीक्षक, पोलीस महिला श्री. वैभव नेटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. ज्ञानेश्वर सानप, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस महिला श्री. ज्ञानेश्वर कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. खोडेवाड पोलीस उपनिरीक्षक, होमगार्ड पुरुष श्री. अशोक पिंपळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रमेश घुले पोलीस उपनिरीक्षक, होमगार्ड महिला, श्री. गणेश झिंझुर्डे, पोलीस उपनिरीक्षक, श्री.राहुल रोटे, पोलीस उपनिरीक्षक, श्रीपतीराव भोसले हायस्कूल, एन. सी. सी. सूवर्णदीप जानराव, श्री. साकेब शेरेकर, तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर, आतार आसिफ, श्री. संकेत जावळे, पोलीस बॅन्ड पथक बॅन्ड मेजर श्री. खंदारे, भैरवनाथ हायस्कूल धारुर स्काऊट श्री. विजय गायकवाड, श्री. आतिश गडदे, अभिनव इंग्लिश स्कूल श्री. सूरज वाघमारे, श्री. अभिजित वारे -अभिनव इंग्लिश स्कूल, पायल मुंदडा, प्राची सुरवसे, तेरणा पब्लिक स्कूल- सार्थक वाघचौरे श्री. अजिंक्य गोरवे, श्री.श्री. रविशंकर विद्यालय सुश्रुत माळी, प्रतिक राठोड, श्री.श्री. रविशंकर विद्यालय, आदित्य बुकण, वैष्णवी लंगोटे, जि.प.कन्या प्रशाला, एन. सी.सी, नर्गिस शेख शबनम पठाण यांची पथके तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग,बेटी बचाओ बेटी पढाओ,दंगल नियंत्रण पथक,पोलीस श्वान पथक,महिला छेडछाड नियंत्रण पथक,अग्निशमन पथक या विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.
या समारोहाच्या सुरूवातीस पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, त्यानंतर त्यांनी खुल्या जीपमधून संचलनात सहभागी झालेल्या विविध पथकांची पाहणी केली. शेवटी पालकमंत्री श्री.गडाख यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी शालेय विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.