उस्मानाबाद /प्रतिनिधी-
इंग्रजी भाषा ही जगाची भाषा आहे.आजच्या जागतिकिरणाच्या काळात आपल्याला इंग्रजी चांगलं वाचता,बोलता,लिहिता आलं पाहिजे स्पर्धा परीक्षेतही ही भाषा खुपच गरजेची झाली आहे या भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी एकमेकात संवाद साधतांना इंग्रजीतून करावा व सातत्याने लेखनाचा सराव करावा असे प्रतिपादन  डॉ.जी.डी.कोकणे (उपकेंद्र)यांनी केले आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.ए.बी.इंदलकर होते.प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमाचे पूजन केले.
यावेळी इंग्रजी विभागातील विद्याथ्र्यांनी कविता,कथा विविध विषयावर लिहून भित्तीपञिका तयार केली होती तिचे उद्घाटन डॉ.कोकणे यांचे हस्ते करण्यात आले होते.
ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना अधिक सुलभपणे इंग्रजी भाषा अवगत व्हावी यासाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत सई देशमुख बी.एस्स.सी भा.2 हिने प्रथम क्रक्रमांक तर पूजा भारती बी.कॉम.भा.2 हिने द्वितीय क्रमांक तर ज्योती कारगल बी.कॉम.भा.2,हिने तृतीय क्रक्रमांक पटकावला या विजेत्या विद्यार्थिनींना डॉ.कोकणे यांचे हस्ते गौरविण्यात आले.प्रास्ताविक प्रा.बालाजी खराडे यांनी केले आभार प्रा.डॉ.एल.व्ही.भरगंडे यांनी मानले.यावेळी डॉ.देविदास इंगळे,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.माधव उगीले,प्रा.राजा जगताप उपस्थित होते.

 
Top