उस्मानाबादेत होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उस्मानाबादकरांच्या जिव्हाळयाच्या असलेल्या विषयाला उद्घाटक पद्मश्री ना.धों महानोर यांनी कष्टकरी, शेतकरी यांचे झुंजार नेते भाई उध्दवराव पाटील यांचा उल्लेख करून त्यांचा यथोचित गौरव करता आला नसल्याची खंत व्यक्त केली. तर संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ.अरूणा ढेरे यंानी उस्मानाबाद जिल्हा मागासलेला नसून संस्कृतीक दृष्टीकोनातून समृध्द आहे. या जिल्हयाला त्यांच्या हक्काचे लवकरच २३ टीएमसी पाणी उपलब्ध करून त्यांचा आनंद लवकरच पहायला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हयातील या दोन प्रश्राला मान्यवरांनी हात घातल्यामुळे यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी गेल्या चार ते पाच दिवसापासून माझी तब्येत खराब आहे, डॉक्टरांना दाखविण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी फिरने व प्रवास करने बंद करा, असे सांगितले आहे. त्यामुळे मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुन्हा येईन, असे म्हणताच सर्वत्र हस्यकल्लोळ झाला. त्यानंतर त्यंानी लगेच त्यांनी सावरा-सावर करून आपल्या बोलण्याचा अर्थ समजावून सांगितला.
घरा-घरातून मदत-नितीन तावडे
स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना गेल्या ७ ते ८ वर्षांपासून या संमेलनासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो. अर्थिक, भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे आम्हाला नाकारले जात होते. परंतू या वेळेस आम्हाला संमेलनाचे यजमान पद मिळाले.या संमेलनासाठी जिल्हयातील प्रत्येक नागरिक दाता झाला. त्यामुळे प्रत्येक घराला हे संमेलन आपले वाटत आहे. राजकारणा विषयी बोलताना राजकीय व्यक्तींचे साहित्य वावडे नाही, असे सांगून साहित्याचा वारसा जपण्यासाठी राज्यकत्र्यांनी पाठबळ देणे महत्वाचे सांगितले.
तुळजाईचा गोंधळ
संमेलनात तुळजाभ्वानी मातेचा गोंधळ रंगला. महिषासुराच्या वधापासून शिवरायांना तलवार देण्यापर्यंतचे सर्व प्रसंग कमी वेळात तुळजापूरच्या महिषासुरमर्दिनी सांस्कृतिक लोककला मंचाच्या कलाकरांनी साकारले. त्यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदक देऊन प्रदान
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष हे नियोजित अध्यक्षाला सूत्रे प्रदान करतात. पण, ही अध्यक्षपदाची सूत्रे गेली अनेक वर्षे अदृश्य स्वरूपात होती. तर मागील एक-दोन संमेलनात ती पुष्पगुच्छ देऊन प्रदान केली जात होती. यंदापासून मात्र, चांदीचे पदक देऊन ही सूत्रे प्रदान करण्यात आली. या पदकावर संमेलन स्थळ, संमेलन वर्षे, अध्यक्ष, संमेलनाचे बोधचिन्ह याचा उल्लेख आहे. असे पदक प्रथमच अध्यक्षाच्या गळ्यात घालून त्यांचा सन्मान केला गेला. मिलिंद जोशी यांच्या प्रयत्नांमुळे हा क्षण उद्घाटन सोहळ्यात अनुभवता आला.
राजकारणी नको, तर मदत का मागता?
उस्मानाबादेत होत असलेल्या 93 व्या मराठी साहित्य संमेलनातून नवे मापदंड घालून देण्याचा प्रयत्न काही अंशी यशस्वी होत असला तरी त्यातून संमेलनाचे आयोजक आणि साहित्य महामंडळाच्या वाट्याला नाराजी येऊ लागली आहे. संमेलन अराजकीय करण्याची नवी परंपरा जन्माला घालताना महामंडळाने लोकप्रतिनिधींनाही मंचापासून दूर ठेवले. त्यामुळे जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार तसेच ज्या शहरात संमेलन होत आहे, त्या शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षही संमेलनाकडे फिरकले नाहीत. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी तर अराजकीय संमेलन करा, पण मग राजकीय नेत्यांकडून मदत कशाला घेता, असा सवाल केला. ते म्हणाले, आमचा नव्हे नगराध्यक्षांच्या खुर्चीचा तरी मान राखायला हवा होता.
वक्ताच्या भाषात कॉंग्रेस नेत्यांचे कौतुक
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्व वक्तांच्या भाषणातून कॉंग्रेसचे पुर्व मंत्री यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, मधुकरराव चव्हाण, अमित देशमुख आदींचे कौतुक करण्यात आल्याने या संमेलनात कॉंग्रेसच्या नेत्यांचा प्रभाव दिसुन आला.
या नेत्यांची अनुपस्थिती
संमेलनात उस्मानाबादी नगरी चे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजिततसिंह पाटील, आ. कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौगुले आदीं अनुपस्थिती दिसुन आली.
तेर येथे साहित्य प्रेमीचे औक्षण
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे अखिल भारतीय साहीत्य संम्मेलनाच्या निमीत्ताने आलेल्या साहित्य प्रेमीचे कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयात औक्षण करून गुलाब पुष्प व तिळगुळ देऊन स्वागत करण्यात येत आहे.
संमेलनात सामवेदी कुपरी समाजाती उपस्थिती
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे कौतुक डोळ्यात साठवण्यासाठी मुंबईच्या वसई भागातील सामवेदी कुपरी समाजातील सुमारे 600 नागरिकांनी संमेलनात हजेरी लावली. खिस्ती समाजापैकीच एक भाग असलेले हे सर्व नागरिक डोक्यावर विशिष्ट लाल टोपी घालून सहभागी झाले होते.
नागटिळक यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
तब्बल 5310 एकपात्री प्रयोग करून नटसम्राट साकारणा-या फुलचंद जरिचंद नागटिळक यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी संत गाडगेबाबा यांचा वेश परिधान करून स्वच्छतेचा संदेश दिला.
अश्वामुळे गोंधळ
साहित्य समेलनाच्या राजे शहाजी महाद्वाराजवळ मिरवणुकीतील अश्व उधळला. यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, संबंधित घोडेस्वाराने प्रसंगावधान राखत अश्वाला बाजूला नेले. अश्व बिथरल्यामुळे आणखी गर्दी वाढली. यामुळे काहीसा गोंधळ संमेलनस्थळी निर्माण झाला होता.
पायरेटेड पुस्तकांविरोधात तक्रार
साहित्य संमेलनातील ग्रंथदालनाचे उद्घाटन होण्यापूर्वीच पायरेटेड पुस्तक विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. नऊ नामवंत प्रकाशन संस्थांची सुमारे 50 हजार रुपये किमतीची पुस्तके नगण्य दरात विकली जात होती. ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलाजपूरकर यांनी इतर प्रकाशन संस्थांच्या प्रतिनिधींनाही याची मािहती दिली. दौरान विक्रेता त्या दरम्यान पसार झाला. हिंगलाजपूरकर व त्यांच्या सहका-यांनी त्याला शोधले मात्र, तो सापडला नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.