गोविंद पाटील /प्रतिनिधी-
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो अखेर शुक्रवारी रात्री ११.३० च्या ट्रेन ने मुंबईला रवाना झाले आहेत.
दिब्रिटो यांचे नाव संमेलनाचे अध्यक्ष म्हणून घोषीत झाल्यापासून गदारोळ निर्माण झाला होता. एवढेच नाही तर संमेलनाच्या उद्घाटनाला पद्मश्री ना.धों महानोर यांनी जावू नये अशी ही मागणी करण्यात आली होती. असे असतानापण दिब्रिटो आणि महानोर दोघे ही संमेलनाला उपस्थित रहिले. फादर दिब्रिटो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात माझी अनापेक्षीत निवड झाल्यामुळे मी कशाला ही घाबरत नाही, शिव्या खाण्याची सवय मला आहे. कारण मी अनेक आंदोलनात भाग घेतला. गेल्या चार दिवसापासून माझी प्रकृती बिघडी असून डॉक्टरांनी मला चालने व फिरने बंद करण्यास सांगितले आहे. त्यांनी आपले पुर्ण भाषण व्हील चेअर बसून केले. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन, असे सांगताच एकच हस्यकल्लोळ झाला. परंतू वास्तव दिब्रिटो यांच्या मणक्यात गॅप पडल्यामुळे त्यांना हलचाल करणे, अवघड जात आहे.रात्री त्यांना परंत त्रास झाल्यामुळे तातडीने त्यांना शुक्रवार रात्री ११.३० वा. मुंबईला रेल्वेने रवाना करण्यात आले.                    आघात झाल्यावरच कविता सुचतात
शनिवार दि.११ जानेवारीचे साहित्य संमेलनाचे सत्र सकाळी ९.३० पासून सुरू झाले. प्रतिभ रानडे यांची प्रकट मुलाखत प्रा.डॉ.दासू वैद्य व सारंग दर्शने यांनी घेतली. त्यानंतर आजचे भरमसाठ कविता लेखन क्रबाळस की सूजञ्ज यावर परिसंवाद झाला. डॉ.अक्षयकुमार काळे यांनी कशा प्रकारचे निष्र्कष काढता येणार असे सांगून वाढत्या कविता यांनी अंतरमुख केल्या आहेत, असे सांगितले. या सुनिता जाधव यांनी कवितेला बाळस आल तर निरोगी समाज मनाचे लक्षण आहे, असे स्पष्ट केले. यावेळी डॉ.श्रीकांत पाटील, अरूण म्हेत्रे, श्रीमती सीमा शेटे-रोटे यांनीही आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.यावेळी आभार प्रदर्शन अॅड.गजानन चौगुले यांनी केले.
‘स्नेहालय’चा मोलाचा वाटा
उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सोलापूर जिल्ह्यातील कारंबा येथील स्नेहालय सामाजिक संस्थेच्या वतीने संमेलनात सहभागी निमंत्रित, पत्रकार, सहभागी यांच्या स्वागतासाठी शबनम पिशवी संस्थापक अध्यक्ष प्रदीपकुमार शिंगवी, उपाध्यक्ष नंदकिशोर भन्साळी, सदस्य शेषनाथ वाघ यांच्या सौजन्याने देण्यात आले. या शबनम पिशवीमध्ये तेल, साबण, डासांपासून बचावासाठी पेपर, कंगवा, नॅपकीन इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. स्नेहालय संस्था वेश्या, अनाथ, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मुलांना मोफत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. या सौजन्याबद्दल साहित्य संमेलन समारोप सोहळ्यात त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सौजन्याबद्दल संमेलन स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांनी आभार व्यक्त केले.

 
Top