तुळजापूर/प्रतिनिधी-
 येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छञपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षियांचा वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमाचे पुजन साविञींच्या लेकिच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीतुळजाभवानी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन अभाविप माजी प्रदेशाध्यक्ष गणेश जळके यांच्या हस्ते गुलचंद व्यवहारै विकास मलबा यांच्या उपस्थितीत करण्यात आले .राजमाता जिजाऊ व आर्य चौकात राजमाता जिजिऊ व स्वामी विवेकानंद याचे प्रतिमा पुजन करण्यात आले.
सर्वापक्षीय कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ शिंदे, सेनेचे सुधीर कदम, छावाचे जीवन इंगळे, कुमार इंगळे, माजी नगरसेवक गणेश कदम, भाजपाचे गुलचंद व्यवहारे, काँग्रेस चे अमित कुतवळ,  पंकज पाटील, दत्ता सोमाजी, मयुर कदम, किशोर पवार, सागर कदम, जगदीश पेंदे, अण्णा क्षिरसागर, कुमर टोले, महेश चोपदार बापुसाहेब नाईकवाडी, युवराज मगर  आदीं उपस्थिती होती.

 
Top