
९३ व्यां साहित्य संमेलनात रंगदृष्टी पुणे निर्मीत शाहीर अमर शेख साहित्य मंचावर सादर करण्यात आलेल्या गावकथा या आगळया वेगळ्या नाटकाने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले.

‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे ठाकूर यांनी यांचे दिग्दर्शन केले आहे. संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलाणी या कलाकरांनी सादर केलेल्या अभिनयाने या नाटकाची रंगत वाडातच जाते आहे. मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे.