उस्मानाबाद/प्रतिनिधी -
मनसेच्या महाअधिवेशनास जिल्हातील हजारो महाराष्ट्र सैनिक अधिवेशनात जाणार आहेत दिनांक 12 जानेवारी 2020 रोजी तुळजापूर येथे पक्षाच्या राजगड कार्यालय येथे उस्मानाबाद-कळंब-तुळजापूर-उमरगा-लोहारा येथील पदाधिका-यांच्या उपस्थित  बैठक झाली.
 या बैठकीत महाअधिवेशनास जाण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले तसेच काही कार्यकर्ते यांचा पक्षात प्रवेश करण्यात आला.  यावेळी मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अमरराजे कदम, जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी बैठकीस मार्गदर्शक केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सांळुके, लोहारा तालुका अध्यक्ष अतुल जाधव, कळंब तालुका अध्यक्ष दत्ता घोगरे, तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत, कळंब शहर अध्यक्ष पवनराजे वर्पे, विज कामगार सेना राज्य सचिव विशाल कांबळे,शिक्षक सेनेचे बबनजी वाघमारे सर,मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हा सचिव सुरज कोटावले, तालुका उपाध्यक्ष, सलीमभाई औटी ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, विद्यार्थी सेनेचे कळंब तालुकाध्यक्ष दयानंद कांबळे,विद्यार्थी सेनेचे लोहारा तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, तुळजापूर विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सौरभ लोखंडे, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, उमेश कांबळे , मनविसे तालुका उपाध्यक्ष अमृत पोतदार, शहर उपाध्यक्ष विशाल माने, संतोष दूधभाते.आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top