लोहारा/प्रतिनिधी
 धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बाबत दि. 17 जानेवारी 2020 रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी तुषार विश्वासराव रंधे व उपाध्यक्ष पदासाठी सौ. कुसुमताई कामराज निकम यांची अधिकृत उमेदवारी पक्षाचे प्रदेश निरीक्षक आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जाहीर केली. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हा परिषद सभापती शिवाजीराव दहिते, शिवाजी दहिते बापू, कामराज निकम, प्रभाकरराव चव्हाण, संजय शर्मा,अनिकेत  पाटील, किशोर सिंघवी व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धुळे एस. व्ही. के. एम. कॅम्पस मध्ये सत्कार करण्यात आला.
 
Top