लोहारा/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जि.प.समाजकल्याणचे नुतन सभापती पदी उमरगा तालुक्यातील गंजोटी जि.प.मतदार संघातील भाजपाचे दिग्विजय कैलास शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा लोहारा तालुका भाजपाच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा मिडिया विभाग तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, विनोद कोराळे, मेघराज हरळे, अन्वर शहा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top