तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील कुंभारी येथील स्वामी डी.पी गेली दीड महिन्या पासुन बंद असल्याने या डीपीवर कनेक्शन असलेल्या शेतक-यांना पाणी उपलब्ध असुनही ते देता येणे शक्य नसल्याने शेतक-यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.
तुळजापूर तालुक्यातीलकुंभारी येथील  तलावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात रबी पिक लागवड केली, माञ गेली दीड महिन्या पासुन स्वामी डीपीवर कनेक्शन लोढ झाल्याने हा डीपी जळुन बंद पडला आहे. त्यामुळे गेली दीड महिन्या पासुन रबी पिकांना पाणी देता येत नसल्याने ते सुकून जात आहे. या पिकांना येत्या आठवड्यात पाणी मिळाले नाही तर पिके जळुन जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे अर्थिक नुकसान होणार आहे या बाबतीत महावितरण कार्यालयात सातत्याने दुरुस्ती साठी चकरा मारून ही आज येतो उद्या येतो म्हणून टाळत आहेत. तरी लवकर डी.पी दुरुस्ती करुन शेतक-यांचे नुकसान टाळुन त्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

 
Top