वाशी/प्रतिनिधी-
तालुक्यातील मांडवा येथील एकाला जुन्या आर्थिक कारणावरून चाकूने वार करून जखमी केले. हा प्रकार सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडला.
मांडवा येथील नितेश श्रीराम काळे पीठगिरणी समोर थांबले असताना गावातील सीमा ज्ञानेश्वर बोधले, ज्ञानेश्वर शामराव बोधले यांनी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, चाकूने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नितेश यांच्या फिर्यादीवरुन वाशीत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.