उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 शहरातील एक युवतीला व्हॉट्सअॅपवरून अश्लील चित्रे पाठवल्याप्रकरणी दोन युवकांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील दोघा युवकांनी उस्मानाबाद येथील एका युवतीचा क्रमांक मिळवून तिच्यासोबत चॅटिंग केली. यावेळी अश्लील शब्दात चॅटिंग करत तिला अश्लील छायाचित्रेही पाठवली. यामुळे युवतीला मानसिक त्रास झाला. तिने तुळजापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. युवकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी तुळजापूर येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने संबंधित दोन युवकांचा नाव- पत्ता शोधला आहे. लवकरच युवकांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
 
Top