उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजापुर येथील गायक श्री प्रसन्नकुमार कोंडो व सौ. गीता कोंडो यांच्या गीत रामायण सेवेला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व वादक कलावंत, आयोजक, सहगायक, ध्वनिसंयोजक,प्रायोजक,माध्यम प्रतिनिधींचा सत्कार छत्रपति शिवाजी स्मारक समिति हैदराबाद चे सचिव श्री पद्माकर लक्ष्मण दीक्षित यांच्या तर्फे श्री क्षेत्र रुईभर येथील दत्त मंदिरात प.पू. अप्पा बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती पुष्पाबाई कोंडो, अंबाजोगाई येथील दत्त संप्रदायातील संतकवि दासोपन्त यांचे वर्तमान वंशज श्री दत्तप्रसाद गोस्वामी,ग.दि.मा. यांची नात डॉ. सायली कुलकर्णी, श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, यांच्या तुळजापुरच्या संपर्क कार्यालय प्रमुख सौ. गीता कोंडो आणि सरस्वती चैरिटेबल ट्रस्ट उस्मानाबादचे सचिव डॉ. महेश पोळ  उपस्थित होते. या कार्यक्रमात प.पू. अप्पा बाबा महाराज, श्री ललत लिंगे (सारोला), प्रा वैभव कुलकर्णी, श्री गोविंदराव अयाचित, श्रीकृष्ण गंगाधर दीक्षित, प्रल्हाद दंडवते, जयहरी जमादाडे, जयंत काबले, सौ वर्षाराणी कूदळे, भागवत कुंभार, बालानंद पांडे, प्रा अशोक कुलकर्णी, सिध्दि काकडे, श्रीपाद देशपांडे,एकनाथ पांचाळ ,रत्नदीप शिगे, अण्णा वडगावकर, प्रमोद ठाकरे, शेषनाथ वाघ, पञकार जगदीश कुलकर्णी, प्रशांत कावरे, डॉ. सायली कुलकर्णी, डॉ. महेश पोळ, सुधीर पवार, प्रसन्नकुमार कोंडो व सौ.गीता कोंडो यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top