उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल आकारू नये तसेच फास्ट टॅग सेवा बंद करावी या मागणीसाठी अधिका-यांना घेराओ घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरुवातीला 30 रुपये असणारा टोल या फास्ट टॅगमुळे 90 रुपये झाल्याचा आरोप करत बराचवेळ टोलनाक्यावरील अधिका-यांना तंबी देत घेराओ घालण्यात आला.
यावेळी अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. लवकरात लवकर संस्थानिक वाहनांना मोफत टोलसेवा देण्यात यावी तसेच फास्ट टॅग सेवा बंद करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने टोल नाक्यावर खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी अविनाश साळुंके, अतुल जाधव, दत्ता घोगरे, धर्मराज सावंत, सलील औटी, पवनराजे वर्पे, बबन वाघमारे, प्रमोद कदम, सूरज कोठावळे, दयानंद कांबळे, विवेक बनसोडे, सौरभ लोखंडे, अक्षय साळवे, उमेश कांबळे, अमृत पोतदार, विशाल माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top