कथले युवक आघाडीसह 4 शाळा व 17 शिक्षकांची निवड 
कळंब /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था ,शाळा व शिक्षकांना  दिल्या जाणा-या जिल्हास्तरीय प्रेरणा पुरस्काराची घोषणा शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती कींवा संस्थेचा जिल्हास्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव केला जातो .विद्यार्थी ,शिक्षक व क्षेत्रिय अधिकारी यांच्या निरीक्षणातुन  कसलाही प्रस्ताव कींवा कागद न घेता ही निवड केली जाते .
या मानाच्या पुरस्कासाठी स्वातंत्र्य सैनिक गणपतराव कथले युवक आघाडी कळंब यांना सामाजिक क्षेत्रातील तर केंद्रिय प्राथमिक शाळा तडवळा ता. उस्मानाबाद, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लीं) ता.वाशी, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा ता.कळंब, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा बाभळगाव ता.कळंब या शाळांच्या निवडीसह नामदेव भागवत पखाले प्रशाला इटकूर ता.कळंब ,विश्वास शंकरराव गायकवाड प्राथमिक शाळा बंगाळवाडी ता.परांडा,नागेंद्र शांतीनाथ होसाळे प्राथमिक शाळा एकूरका ता.कळंब , श्रीमती मनिषा महादेव क्षीरसागर प्राथमिक शाळा खोताचीवाडी ता .तुळजापुर, रामराजे हरिश्चंद्र जावळे केंद्रिय प्राथमिक शाळा गौर ता.कळंब  , राजेंद्र तुळशीराम सुर्यवंशी प्राथमिक शाळा चिरेवाडी ता.उमरगा, श्रीमती मिरा राधाकीसन आणेराव प्राथमिक शाळा वाठवडा ता.कळंब, शिवाजी पांडुरंग डांगे केंद्रिय प्राथमिक शाळा चिलवडी ता.उस्मानाबाद , श्रीमती सुवर्णमाला सुभाष डीकले प्राथमिक शाळा मंगरुळ ता.कळंब ,अयुब रसुल शेख केंद्रिय प्राथमिक शाळा पारा ता.वाशी, राजाभाऊ कुंडलीक गुंजाळ प्राथमिक शाळा हसेगाव (केज) ता.कळंब , श्रीमती वर्षा वसंतराव पाटील प्राथमिक शाळा घाटनांदुर ता.भुम, किशोर परसराम गायकवाड प्राथमिक शाळा सात्रा ता.कळंब, श्रीमती ज्योती दिलीप कदम-पाटील केंद्रिय प्राथमिक शाळा लोहारा ता.लोहारा,उत्तम दगडु अवधुत प्राथमिक शाळा खामसवाडी ता.कळंब, श्रीमती मैना शेषेराव रंजवे प्राथमिक शाळा सौंदनाअंबा ता.कळंब या 17 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
पुढील फेब्रुवारी महिन्यात मान्यवरांच्या शुभहस्ते कळंब येथे या प्रेरणा पुरस्काराच्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री तांबारे यांनी सांगितले
प्रेरणा पुरस्कार निवड झालेल्या कथले युवक आघाडीसह सर्व शाळा व शिक्षकांचे बाळकृष्ण तांबारे , सोमनाथ टकले,अशोक जाधव, भक्तराज दिवाने , लक्ष्मण पडवळ ,रामकृष्ण मते , संतोष देशपांडे , विठ्ठल माने, श्रीनिवास गलांडे, व्यंकट पोतदार, सुधीर वाघमारे, अर्जुन गुंजाळ, श्रीमती अनुराधा देवळे, श्रीमती रोहिणी माने श्रीमती अरुणा वाघे, राहुल भंडारे ,दत्तात्रय पवार डी.डी.कदम,रामेश्वर शिंदे,संतोष मोळवणे,शिवाजी शिंदे ,सुदर्शन जावळे ,तानाजी बिराजदार श्रीमती वैशाली क्षिरसागर यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top