तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील सोयाबिन चोरी प्रकरणी दोन आरोपीसह सोयाबिन व छोटा टॅम्पो पकडण्यात तेर दुरक्षेञचे बिट अंम्मलदार प्रकाश राठोड यांना यश आले आहे.
हिंगळजवाडी येथील राजाराम देवकर यांच्या शेतातून 29 नोंव्हेबर 2019 च्या राञी 35 कट्टे सोयाबिनची चेारी झाली होती.या प्रकरणी ढोकी पोलिस स्टेशनला अन्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी तेर दुरक्षेञचे बिट अम्मलदार प्रकाश राठोड यानी या चोरीचा कसून तपास करून 3 जानेवारी 2020 रोजी प्रकाश मोतीराम पवार (रा.पळसप ) व महादेव राजाराम इंगोले (रा.पळसप)  यांना या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्याकडून 10 कट्टे सोयाबिन व छोटा टॅम्पो (क्रमांक एमएच 12 जेएफ 6159) जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

 
Top