उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत असणारी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची  उस्मानाबाद येथे मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या जिल्हा बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.  सर्वप्रथम शहीद वीर भगतसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजि. शामकांत नाईकनवरे व शहराध्यक्ष रवींद्र अंबुरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारणीमध्ये सुदर्शन साखरे यांची जिल्हा सचिव पदावर तर  अक्षय जाधव - तालुकाध्यक्ष, गजानन लाकाळ - तालुका कार्याध्यक्ष, बालाजी जावळे - तालुका संघटक, विकास डोंगरे - तालुका संघटक सागर शिंदे सरकार - शहराध्यक्ष, प्रतीक कांबळे - शहर सचिव, अजय चव्हाण - शहर उपाध्यक्ष ओंकार केवळराम - शहर उपाध्यक्ष, आकाश बोरले - शहर संघटक राज कांबळे - शहर कार्याध्यक्ष, आकाश राठोड - शहर संघटक, ओमकार शिंदे - शहर संघटक यांच्या नियुक्तीपत्र देऊन निवडी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा प्रवक्ते प्रमोद भोंग व नामदेव वाघमारे यांनी संघटनेच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष रवींद्र अंबुरे व तालुकाध्यक्ष शामकांत नाईकनवरे यांनी  मनोगत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.  सुत्रसंचालन शहराध्यक्ष सागर शिंदे व शहर सचिव प्रतीक कांबळे यांनी आभार मानले.

 
Top