उस्मानाबाद /प्रतिनिधी-
चाणक्य मंडल ,पुणे चे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी देशभरामध्ये स्पर्धात्मक परीक्षा द्वारे प्रशासकीय सेवेत अनेक गुणवंत विद्यार्थी प्रशिक्षित करून देशसेवेत मोठा सहभाग नोंदविला आहे त्यंानी केलेल्या त्यागाची माहिती देऊन त्यांच्या जीवनातून विद्याथ्र्यांनी प्रेरणा घ्यावी. स्पर्धा परिक्षाचा सामना सकारात्मक विचाराने करावा, असे आवाहन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले.
भूम तालुका ईट येथे गेली अनेक वर्षांपासून स्पर्धात्मक परीक्षांसाठी ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांची तयारी करून घेणा-या आणि  गुणवंत विद्याथ्र्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळवून देणा-या वीर भगतसिंग अकॅडमी ,ईट येथे अविनाश धर्माधिकारी यांच्या एकसष्टी निमित्त कार्यक्रम केक कापून संपन्न झाला.  यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविक प्रताप देशमुख यांनी केले. सुमंत वेदकुमार वेदालंकार यांची प्रमुख उपस्थिती होते.

 
Top