कळंब /प्रतिनिधी -
समाजविकास सामाजिक संस्था व गुंज मुंबई या दोन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातेफळ गांवात श्रमदान जलसिंचनाच मोठ कार्य साकार करण्यात आले. तसेच गांवात व शाळेच्या बाजूला श्रमदानातून नाल्याचे रुंदीकरण करण्यात आले. या कामासाठी गावातील पन्नास युवक, महिला व पुरुषांनी श्रमदान केले.
गावातील तरुण वैभव गरड गेली तीन वर्षांपासून गावातल्या लोकांना बरोबर घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून जलसिंचनाचे खूप मोठे कार्य करीत आहेत. यावेळी समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अजित कांकरिया गुंज मुंबई, सतीश जाधव, विशाल वाघमारे, महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वैभव गरड यांनी मोलाचे सहकार्य केले.