उस्मानाबाद/प्रतिनिधी-
एकल (विधवा,परित्यक्ता,घट स्पोटीता व प्रौढ कुमारीका) महिलांचे समाजातील जिवनमान उंचावणे,त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे,त्यांचा समाजातील जिवनमान उंचावणे,त्यांना विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, एकल महिलांची लिडरशिप वाढावी,एकल महिलांची शासन दप्तरी स्वतंत्र नोंद नसल्यामुळे त्यांना एकल असल्याचे कागदपत्रे मिळत नाहीत परिणामी त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहून हलाखीचे जिवन जगावे लागते म्हणून एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र नोंदणी रजिस्टर ठेवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन एकल महिला संघटना,लोकप्रबोधन सामाजिक संस्था आरळी,आधार सामाजिक संस्था परंडा,शिवप्रताप सामाजिक संस्था बुकनवाडी,भारतीय ग्रामीण विकास संस्था लोहारा यांच्या वतीने जिल्हाधिका-यांना दि.13 जानेवारी रोजी देण्यात आले.      
 एकल महिला संघटना ही मागील पाच वर्षापासून मराठवाड्यातील चार जिल्ह्यातील 14 तालुक्यात 300 गावात काम करते संघटनेचे 16 हजार सभासद आहेत.संघटना एकल महिलांच्या सोबत काम करीत असल्याने त्यांच्या समस्यांचा खोलपणे अभ्यास केला आहेत त्यात प्रामुख्याने रेशन,पेंन्शन,घरकुल तसेच विविध शासकीय योजना त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत किंबहुना त्यांच्याकडे एकल असल्याचा शासकीय पुरावा नसल्यामुळे त्या योजनांपासून लांब राहतात म्हणून *एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थांत स्वतंत्रपणे नोंद* होण्यासाठी स्वतंत्र नोंदणी रजिस्टर ठेवावे व येणाऱ्या 26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत तसा ठराव पारीत करावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे अशाच मागणीचे निवेदन जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी यांना ही देण्यात आले.
निवेदनावर सुरेखा भोसले,कांता शिंदे,अनिता नवले,उर्मिला म्हंकराज,ज्योती बिराजदार,प्रतिभा मेटे,उषा,ढवळे,सुधाकर बुकन,धनाजी धोतरकर,जुल्फिकार काझी आदिंच्या सह्या आहेत.

 
Top