उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संपूर्ण भारतात 14 जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात खगोलशास्त्र- एक बहुआयामी शास्त्र या विषयावर आदित्य गोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी आदित्य गोरे यांनी विद्यार्थ्यांना ग्रह, तारे यांची ओळख करून देत इतर शास्त्राशी खगोलशास्त्र कसे जुडले गेलेले आहे. यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान खगोलशास्त्रासंबंधी माहिती देताना प्रोजेक्टरच्याद्वारे विविध चित्रफिती दाखवत गोरे यांनी प्राचीन काळापासून विकसित होत गेलेले खगोलशास्त्र, दुर्बिणींचे प्रकार, जगात सध्या कार्यरत असलेल्या अत्याधुनिक दुर्बिणी, विश्वाच्या उदयास कारणीभूत असणारा महाविस्फोट सिद्धान्त, उल्कापात, विशिष्ट कालावधीनंतर दिसणारे धुमकेतू, पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे घडत असलेल्या घडामोडी, नक्षत्रे, आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रहांचे अवकाशातील स्थान आकृती काढत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. हे करत असतानाच खगोलशास्त्राचा सर्व शास्त्रांशी, मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. आणि त्याचे महत्व जाणून विद्याथ्र्यांनी या विषयावर अभ्यास करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनीही खगोलशास्त्रासंबंधी शंकांचे समाधान करून घेतले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.संतोष घार्गे तर कला विभाग प्रमुख प्रा.नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.अरविंद भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मनोज डोलारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डी.वाय. घोडके तर आभार प्रा.रविंद्र माने यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विवेक कापसे, प्रा.विश्वंभर सुर्यवंशी, आबासाहेब घोडके, महादेव काळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कलाशाखेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्याथ्र्यानी उपस्थित होते.