तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने सांस्कृतिक महोत्सवाची खंडीत परंपरा सुरु करण्याचे कार्य उल्लेखनीय असुन पुजारी मंडळाच्या समस्या बाबतीत निश्चित मार्ग काढु असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त रामेश्वर रोडगे यांनी शाकंभरी सांस्कृतिक उत्सवाचा समारोप कार्यक्रमात केले.
या प्रसंगी व्यासपीठावर आ. सुजितसिंह ठाकुर तहसिलदार सौदागर तांदळे तहसिलदार योगिता कोल्हे दत्ता कुलकर्णी अँड अनिल काळे सज्जन सांळुके महोत्सव प्रमुख प्रा धनंजय लोंढे अदि मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील स्पर्धकांना मान्यवर पाहुण्यांचा हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच बुबासाहेब पाटील, शहाजी टोले, विनायक कांबळे, ओमप्रकाश खंडेलवाल, प्रा.अरविंद हंगरगेकर,  देविदास हुच्चे,पद्ममीनबाई जाधव यांना पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक महोत्सव प्रमुख प्रा. धनंजय लोंढे यांनी केले तर सुञसंचालन प्रकाश मगर, सुयश अमृतराव यांनी केले. आभार किरण क्षिरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुजारी मंडळाच्या संचालकांनी परिश्रम घेतले.

 
Top