कळंब/प्रतिनिधी-
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मध्ये 10 हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने कळंब तहसिलदार यांना निवेदन देउन करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मुलींसाठी पहीली शाळा ज्यांनी पुणे येथे सुरू केली आशा क्रक्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने सावित्रीबाई फुलेे शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती,भटक्याविमुक्त जाती, जमाती, एसबीसी आदी वर्गासाठी सद्य स्थितीत 1000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती विद्यार्थींनींना सुरु आहे. परंतु तिन्ही वेळेत मिळत नाही तसेच सद्यस्थितीत महागाई वाढली असून, सदरील शिष्यवृत्ती अपुरी पडत असल्याने शासनाने 10 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी,अशी मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने कळंब तालुका अध्यक्ष धनंजय ताटे यांनी केली आहे. या निवेदनावर शहर अध्यक्ष सनी कांबळे, उमेश देणे, आकाश ताटे, विक्की भंडारे, आझर सय्यद, सचीन लोंढे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top