उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भूम तालुक्यातील वंजारवाडी शिवारात शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
तानाजी रंगनाथ जगताप (रा. वंजारवाडी) हल्ली राहणार नाहुली ता. केज यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि.15 रोजी सकाळी 11 वाजता ते शेतात असताना सतीश जगताप, रमेश जगताप, उत्कर्ष जगताप यांनी जमिनीच्या वादातून तानाजी यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच सतीश जगताप याने बंदुक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याच प्रकरणी रमेश जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, तानाजी जगताप, विलास जगताप, बाळु जगताप, लहु जगताप, निळकंठ जगताप व अनोळखी एक व्यक्ती सर्व (रा. नाहुली) यांनी रमेश जगताप व त्यांच्या मुलास मारहाण करुन जखमी केले. तानाजी जगताप याने पिस्टल दाखवून ठार मारण्याची धमकी दिली.