उस्मानाबाद शहरात झालेल्या ९३ व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वृत्र्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारास पोलिस कर्मचा-यांनी धक्काबुकी करून अपमानास्पद वागुणक दिली. या घटेनचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून संबंधित पोलिस कर्म-यावर कठोर कार्रवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सोमवार १३ जानेवारी रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे. कार्रवाई नाही झाली तर २६ जानेवारी नंतर उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
जिल्हाधि-यांना दिलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जी.बी.राजपूत, देवीदास पाठक, कमलाकर कुलकर्णी, आकाश नारोटे, अझहर शेख, बिभिषण लोकरे, राहुल कोरे, अमजद सय्यद, बालाजी निरफल, हुकमत मुलाणी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.