उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्यात सर्वत्र चांगले हायवे झाले आहेत, हायवेवर वाहन कशा प्रकारे चालवावेत याचे प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. जीवन आणि मरण यातले अंतर म्हणजे रस्ता सुरक्षा कार्यक्रम असला तरी हायवेला अॅप्रोच रोड न सोडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे, असे प्रतिपादन खा.ओमराजे निंबाळकर यांनी केले.
सडक सुरक्षा जीवन रक्षा हा कार्यक्रम सोमवार १३ जानेवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळेस नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, भाजपाचे नेता सुधीर पाटील, बाधकामचे कार्यकारी अभियंता अनिल सगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गलांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, एसटी विभाग नियंत्रक राजीव साळवे, युनिटीचे अनिल विपत, व्यापारी संघाचे संजय मंत्री, कार्यकारी अभियंता मिलींद वाबळे, मैनोद्दीन पठाण आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.ओमराजे निंबाळकर यांनी वाहन सुरक्षीत चालविण्यासंदर्भातील नियम, वाहतुक नियम यांचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी केली. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी खाजगी क्लासेसला येणा-या विद्याथ्र्यांना वाहन घेऊन येऊ नका, असे स्पष्ट सांगणे आवश्यक आहे, खाजगी क्लासेसला जाताना अनेक विद्याथ्र्यांचे अपघात झाले ही गोष्ट मी गेल्यावर्षीही कार्यक्रमात सांगितली होते, परंतू त्यांची अंमलबजावणी झाली नाही, असी खंत व्यक्ती केली.
आ.कैलास पाटील यांनी वाहतुक नियम पाळा आणि परिवाराची काळजी करा असे सांगितले. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले, पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय अधिकारी रोडगे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले, ते म्हणाले की, दरवर्षी देशात १ लाख ५० हजार लोंकांचा मृत्यू अपघात होतो. जगातील टक्केवारीमध्ये वाहन कमी पण अपघात जास्त अशी टक्केवारी आहे, त्यामुळे नियमांचे पालन करने आवश्यक असल्याचे सांगितले. शेवटी आभार मिलींद खानोरे यंानी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्याथ्र्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमास उपप्रादेशिक वाहन कार्यालयातील अतुल चव्हाण, वाहतुक शाखेचे धरमसिंह, प्रियदर्शनी उपासे, प्रशांत भांगे, नृसिंह कुलकर्णी, मोटार ड्रायव्हींग असोसिएशनचे दिपक थोरबोले आदीची उपस्थिती होती.
 
Top