उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आपली मातृभाषा मराठी आहे तिचा आपल्याला अभिमान आहेच मराठी भाषेला एक चांगली परंपरा आहे मराठी भाषेत साहित्य विपुलप्रमाणात निर्माण झाले आहे आशा परिस्थितीत आपण इंग्रजी भाषेकडे प्रतिष्ठीची म्हणून पाहू लागल्याणे आपणच आपल्या घरात मराठी भाषेकडे दुर्लक्ष करू लागल्याणेच मराठी भाषा मागे पडू लागली आहे यासाठी आपल्याला मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी कार्यस्र5म घ्यावे लागत आहेत.न्यायालयीन कामकाज हे मराठीतूनच झाले पाहिजे, असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रा.राजा जगताप  यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे वतिने  "1  ते 15 जानेवारी 2020 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"निमित्त न्यायायीन कामकाजात मराठी भाषेचा वापर या विषयावर दि.14 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलतांना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यशाळे‘या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश  तथा   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा श्रीमती.एस.एम.शिंदे, तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्रा.विवेक कोरे उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख वक्ते यांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले.प्रास्ताविक मा.श्री.एस.बी.तोडकरयांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन  श्रीमती.एस.एम.शिंदे यांनी केले. यावेळी अॅड.अजय वाघाळे व अॅड.राज कुलकर्णी यांचा  श्रीमती.एस.एम.शिंदे यां‘या हस्ते  सत्कार करण्यात आला. सूञसंचालन अॅड.अजय वाघाळे यांनी केले. आभार मा. न्यायाधीश श्री.गोसावी यांनी मानले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी ,विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top