तुळजापूर/प्रतिनिधी-
 तिर्थक्षेञ तुळजापूरातील वाहतूक व्यवस्था सुरुळीत राहावी यासाठी लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या सिग्नल व्यवस्थेतील एक एक पार्ट दिवे निखळुन पडू लागल्याने, या सिग्नल व्यवस्थेला कुणी वाली आहे की, नाही असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहारात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित नसल्याने याचा फटका सातत्याने महामार्ग रोड व शहरातील भाविकांना बसून वाहतूक कोंडी निर्माण होवुन बसत आहे . पोलिस खात्याला तर याचा मोठा फटका बसत असुन येथील वाहतूकीस शिस्त लागवी म्हणून खुद्द उपविभागीय पोलिस अधिका-यास रस्त्यावर उतरावे लागत आहे. सध्या शहारातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमणात पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे. शहरता वाहतूकीला शिस्त लागावी या वाहतूक कोंडीचा ञास भाविकांना होवू नये म्हणून लाखो रुपये खर्च करून तुळजापूर विकास प्राधिकरणातुन सिग्नल व्यवस्था उभारली माञ ही व्यवस्था कार्यान्वित केल्या पासुन काम करीत नसल्याचे नागरिकांन मधुन बोलले जात आहे.
अनेक वर्षापासून सिग्नल व्यवस्था बंद आहे. आता या सिग्नल व्यवस्थेच्या खांबावरील एक -एक  दिवे गळुन रस्त्यावर पडत आहेता.  याकडे  कुणाचेही लक्ष आहे की नाही असा प्रश्र उपस्थित केला जात आहे. लाखो रुपये खर्चुन तयार केलेली सिग्नल व्यवस्थेची किरकोळ दुरुस्ती करुन ती कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.
 
Top