तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील जवाहर नवोदय विद्यालयातील तीन विद्यार्थी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परीक्षा पे चर्चा या विषयावर संवाद साधण्यासाठी सोमवार दि.२० रोजी होणा-या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. यात केदार विजयकुमार गवारे, अविष्कार विलास सलगर, ऐश्वर्या युवराज सुरवसे हे नवोदयचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्याथ्र्यांची निवड ऑनलाईन परीक्षा देऊन झालेली आहे. यासाठी ननवी ते बारावीपर्यंतच्या विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली होती. या तिन्ही विद्याथ्र्यांचे जिलाधिकारी दिपा मुधोळ, प्राचार्य के.वाय.इंगळे आदींनी कौतुक केले आहे.
 
Top