तुळजापूर/प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूरात सुरु करण्यात आलेल्या नव्या वाहतुक प्लॉन मध्ये भाविकांच्या सोयीसाठी किरकोळ बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
दर्पण दिनाचे औचीत्य साधुन स्थानिक पञकारांना गुलाबपुष्प देवुन शुभेच्छा दिल्यानंतर पञकारांशी बोलताना डॉ. टिपरसे म्हणाले की, उस्मानाबाद पोलिस दलाचा वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत तिर्थक्षेञ तुळजापूर येथील पोलिस संकुलात गोरगरीब सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थीसाठी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी ग्रंथालय व नामवंत अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन शिबीर घेणार असुन या उपक्रमाचे उद्घाटन लवकर करण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. भक्त निवास, लाँज, धर्म शाळा येथे वास्तव्यास येणा-या प्रत्येक भाविकांची नोंद होण्यासाठी एक अँप्लीकेशनवर लॉज, धर्मभक्त निवास चालकांना देण्याचे पन्नास टक्के काम झाले असुन यावर येथे आलेल्या भाविकाची नोंदणी होताच त्याची माहीती पोलिस स्टेशनला मिळणार आहे. लाँज वर अल्पवयीन मुलगी आढळली तर लाँज मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगुन यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर ची सुरक्षा अधिकच मजबूत होणार आहे.
वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात ते म्हणाले की, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या नव्या प्लॉनला नागरिकांनसोबत भाविकांचे सहकार्य लाभत असुन त्यांना ही बदल चांगला वाटत असल्याचा प्रतिक्रीया येत आहे. आणखी काही ञुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्ही भवानी रोडसह अन्य वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होवू देणार नाही यासाठी जादा पोलिस बंदोबस्त न मागवता उपलब्ध बंदोबस्तावर हे काम करीत आहोत, असे सांगितले. यावेळी  पो. नि हर्षवर्धन गवळी उपस्थितीत होते.

 
Top