पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात दर्पण दिन सोमवारी (दि.6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले.  कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी तथा खनिकर्म अधिकारी श्री. सय्यद, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, राजाभाऊ वैद्य, एस.ए. सय्यद, अंबादासदानवे, देविदास पाठक, प्रशांत कावरे, शिला उंबरे, सुभाष कदम,उपेंद्र कटके, संतोष शेटे, कैलास चौधरी, किशोर माळी, अजित माळी, नंदू पवार, सलीम पठाण, नवाब मोमीण, प्रशांत नेटके, राहुल सूर्यवंशी, गोविंद पाटील, गणेश जाधव,  हरी खोटे, दत्ता शिंदे, सचिन व्हनसनाळे, संतोष जोशी, प्रशांत गुंडाळे,  प्रशांत नेटके, सुरज बोराटे, सचिन वाघमारे,बालाजी निरफळ, शाहरूख सय्यद, अमजद सय्यद, हेमंत कुलकर्णी, कलीम मुसा, छायाचित्रकार राहुल कोरे,राजाभाऊ नांदे यांची उपस्थिती होती.
 शिबिरात मधुमेय, थॉयराईड, किडणीसह विविध आजारावरील रक्त तपासणी करण्यात आली. शेवटी संघाचे सरचिटणीस श्री.जाधव यांनी आभार मानले. शिबिरासाठी हिंद लॅबचे अबुबक्कर पठाण, कौसर सय्यद, सुफीयान पटेल, अन्सार शेख यांनी परिश्रम घेतले.
 
Top