तेर/प्रतिनिधी-
 गळफास घेऊन एकाची आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 17 जानेवारीच्या रात्री घडली.
 द्बोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की तेर ता. उस्मानाबाद येथील काशिनाथ विश्वनाथ थोरात (60) यांनी  रागाच्या भरात 17 जानेवारीच्या रात्री स्वत:च्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत ढोकी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास तेर दूरक्षेत्राचे बीट अंमलदार प्रकाश राठोड करत आहेत.
 
Top