कळंब/प्रतिनिधी-
राज्यातील जिल्हापरिषद सह नगरपालीका व खाजगी संस्थेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सततच्या प्रशिक्षणामुळे सर्वच प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा होत असुन  विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसुन येत आहे  चालु जानेवारी महिन्यातच निष्ठाची प्रशिक्षणे महिन्याभर चालु राहणार असुन प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहावरही विरझण पडणार आहे.
 शासन  शैक्षणिक वर्षाच्या सुरवाती पासुनच शिक्षकांची विविध प्रशिक्षणे घेण्यास सुरवात करते खरतर या प्रशिक्षणाचा अध्यापन प्रक्रीयेत कसलाही उपयोग होत नाही उलट या प्रशिक्षणासाठी शासनाचा पैसा व शिक्षकांचा वेळ खर्च होतो वर्षभरात प्रत्येक शाळेतील प्रत्येक  शिक्षक प्रशिक्षणाच्या मुळे कमीतकमी 15ते 20 दिवस शाळेच्या बाहेरच असतात व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्यातरी शाळेतील प्राथमिक शिक्षकच बोलावले जातात म्हणजे प्रशिक्षण घेणारा ही प्राथमिक शिक्षक व प्रशिक्षण घेणारा ही प्राथमिक शिक्षकच असतो या मुळे देशातील भावी पिडीचे नुकसान मात्र मोठे होते . तसेच राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांना बी.एल ओ , निवडणुक ,जनगणना, विविध सर्वेक्षण अशी  कामे  ही प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाच करावी लागतात कांही वेळा तर तहसिलदार शिक्षकांची आदेश काढून तहसिलमध्ये वर्ष,सहामहिने प्रतिनियुक्तीच करुन घेतात  खर तर ही सर्व अशैक्षणिक कामे  शिक्षकांना देऊ नयेत असा उठाव पालक , सामाजिक व राजकीय मंडळी कडुन होणे अपेक्षित आहे पण तसे आजपर्यंत तरी असे कधी झाले नाही
या नविन वर्षाच्या सुरवातीलाच जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यात 30 ते 35 दिवस प्रशिक्षण चालणार आहेत त्या मुळे जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या विविध खेळाच्या स्पर्धा , बौद्धिक स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,लेझिम,टिपरी नृत्य घेण्यास शिक्षकांना वेळच मिळणार नाही त्या मुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर व उत्साहावर विरझण पडणार असुन त्यांना त्याच्यातील विविध कला त्यांच्यातील सुप्त गुण दिसणार नाहीत
तसेच इयत्ता 5 वी व 8 वी ची 16 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्याचा सराव ही घेणे शिक्षकांना घेणे शक्य होणार नाही. तरी राज्य शासनाने शिक्षकांची विविध प्रशिक्षणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यावर एप्रिल महिन्यात घ्याव्यात अशी मागणी होत आहे.

 
Top