लोहारा/प्रतिनिधी
न्यू व्हीजन इंग्लिश स्कुलमध्ये  राजमाता जिजाऊ जयंती व  स्वामी विवेकानंद यांची जयंती " युवा दिन " म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक प्राचार्य शहाजी जाधव, नगरसेवक श्रीनिवास माळी, पत्रकार गिरीष भगत, पालक प्रतिनिधी  हरिभाऊ लोखंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस  उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर स्कुलमधील सर्व विध्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना श्रीनिवास माळी यांनी स्वामी विवेकानंद यांची " देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सिखे " कविता सादर केली तसेच माँ जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न शिवबानां दाखवून ते पूर्ण करण्यासाठीही पावलोपावली त्यांना मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवली. आशा शब्दात या दोन थोर व्यक्तिमत्वाचे जीवनचरित्र सर्वांसमोर मांडले. यानंतर उस्मानाबाद येथे "उमेद" तर्फे पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते लोहा-यातील पत्रकार गिरीष भगत यांना पुरस्कृत केल्याबद्दल स्कुल तर्फे ही  "दर्पणकार" बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पंजरकर यांनी केले तर आभार व्यंकटेश पोतदार यांनी मानले. याप्रसंगी स्कुलमधील विध्यार्थी, शिक्षक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top