उमरगा /प्रतिनिधी-
 महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) उस्मानाबाद व्दारा संचलित ज्ञानदिप लोकसंचलित साधन केंद्र, उमरगा कार्यालया मार्फत साविञीबाई फुले जयंती निमित्त बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह मैदान,उमरगा येथे बचत गटातील महिलांसाठी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन किशोर टोंपे यांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
त्यानंतर कब्बडी, खो-खो, 100 मिटर धावणे, संगीत खुर्ची व रस्सी खेच या स्पर्धा घेण्यात आल्या. या खेळास महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला या वेळी कब्बडी स्पर्धेत राजमाता महिला कब्बड्डी संघाचा प्रथम क्रक्रमांक तर मदिना महिला कब्बड्डी संघाचा दुसरा क्रक्रमांक मिळवला. खो-खो मध्ये लक्ष्मीदेवी महिला संघाचा प्रथम क्रमांक तर रमाई महिला संघाने दुसरा क्रक्रमांक मिळवला. तसेच रस्सीखेच मध्ये मदिना महिला संघाने प्रथम क्रक्रमांक व अहिल्यादेवी महिला संघाने दुसरा क्रमांक मिळवला मिळवला. 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत सौ. संगिता अजित गायकवाड प्रथम क्रक्रमांक , सौ. सुशिला तिम्मना दंडगुले दुसरा क्रक्रमांक तर सौ. हालिमा आसिफ शेख  यांनी तिसरा क्रक्रमांक मिळविला त्याच बरोबर संगीत खुर्ची स्पर्धेत सौ. मीराबाई गायकवाड प्रथम क्रक्रमांक , सौ.छाया रमेश शिंदे दुसरा क्रक्रमांक तर सौ. अनिता गायकवाड यांनी तिसरा क्रक्रमांक मिळविला. यावेळी पंच म्हणून श्री.प्रतापसिंग राठोड , अतुल गायकवाड  व श्री.दिपक शिवशरने यांनी काम पाहिले
 तर कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ.सखु सोनकांबळे यांनी केले. शेवटी अभार प्रदर्शन दयानंद देशमुख यांनी केले. या वेळी सौ. अनुसया जाधव, सौ. छाया शिंद व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री.शाक्यदिप कांबळे, मनिषा शिवचरने, सौ. संगिता गायकवाड , सौ.अयोध्या बनसोडे यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी विजेत्यांना बक्षिस वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top