उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जीवनात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यक्तीमत्व विकास करणेही आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच ज्याचे व्यक्तीमत्व प्रभावी आहे, अशा व्यक्तींना यश मिळविणे अधिक सोपे जाते, असे प्रतिपादन व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षक अर्शद सय्यद यांनी केले.
उस्मानाबाद येथील विधि महाविद्यालयात मंगळवारी व्यक्तीमत्व विकास या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एस. आर. कठारे, प्रा. संजय आंबेकर, प्रा. रंगराव शिंदे, प्रा. शहा, डॉ. नौमान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत अर्शद सय्यद यांनी व्यक्तीमत्व विकासासाठी आवश्यक असणारे आठ टप्पे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगत जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीमत्व विकास किती महत्वाचा आहे व तो कसा आत्मसात करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कठारे यांनी मार्गदर्शन करताना अशा कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळविण्यासाठी उपयोग होईल, असे सांगून विद्याथ्र्यांनीही व्यक्तीमत्व विकासाच्या बाबी आत्मसात कराव्यात, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय आंबेकर यांनी केले. कार्यशाळेला विधि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्याथ्र्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.