तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने दि. 20 व 21 जानेवारी  पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय अविष्कार 2019-20  मध्ये घवघवीत यश संपादन केले. यामध्ये प्रथमेश गुरव ,शुभम माने , सुरेश हुसे , विद्यासागर फासे  या चार विद्यार्थींनी सहभाग नोदंवला होता.सहभागी विद्याथ्र्या मधुन प्रा. डॉ. अनिल शित्रे यांचे पीएच. डी. चे विद्यार्थी विद्यासागर फासे व सुरेश हुसे यांच्या संशोधन प्रकल्पाची पीपीजी-विज्ञान गटामधुन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाने मुबंई विद्यापीठामध्ये होणा-या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली. यासाठी अविष्कार महाविद्यालय समन्वयक म्हणून डॉ. प्रविण भाले यांनी तर सदस्य म्हणून डॉ. अशोक कदम, डॉ. शिवाजी जेटीथोर  यांनी काम पाहिले.
या मिळालेल्या यशानंतर बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मधुकरराव चव्हाण, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगांवकर, कार्याध्यक्ष सि. ना. आलूरे गुरुजी, सचिव मा. उल्हास बोरगावकर, उपाध्यक्ष संभाजी पाटील बाभळगांवकर, संचालक बाबुराव चव्हाण  तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन बाबरे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव,सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रा. डॉ. गोविंद काळे, अधिक्षक धनंजय पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले.

 
Top