
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे बीड जिल्हा मुप्टा संघटने मार्फत तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी येथील सहशिक्षिका श्रीमती मनीषा महादेव क्षीरसागर - खडके व त्यांचे पती अशोक चंद्रकांत खडके या दोघा दाम्पत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवले व बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय श्रीमती नजमा उस्मानी यांच्या हस्ते क्रक्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुप्टा संघटनेचे प्राध्यापक प्रदिप रोडे होते. तर प्रमुख म्हणुन मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव प्राध्यापक सुनील मगरे, सुभाष राऊत, अशोक बनसोड, डॉक्टर संभाजी वाघमारे, प्राध्यापक राम गव्हाणे, माननीय शरद मगर, श्रीकांत वारभुवन, माननीय शेख अजित राजा, डॉक्टर सुशील कुमार सरवदे, खंडू भुजबळ, महेश वाघमारे अहिल्या काळे, स्नेहा वाघमारे, मानस वाघमारे आदी उपस्थित होते.