उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती अवसपर कल्याणसागर विद्यालय परंडा येथे राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. हा युवासप्ताह दि.12 जानेवारी ते 19 जानेवारी 2020 या कालावधी मध्ये संपन्न होणार आहे.
या युवा सप्ताहामध्ये स्वछता अभियान, योगा, आरोग्य विषयक माहिती, शासकीय योजना माहिती, युवक मार्गदर्शन व्याख्याने, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा होणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आ.सुजितसिंह ठाकूर, नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद लेखाधिकारी विकास कुलकर्णी,प्रज्ञाताई कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण  गरड  , आनंद खरडेकर, मुजीब काझी,  प्रकाश कशीद , मु.अ. चंद्रकांत पवार , विद्यार्थी , युवक, शिक्षक, रणजीत पाटील, रामेश्वर चोबे आदींची उपस्थिती होती.
 
Top