भूम/प्रतिनिधी-
बेकायदेशिररीत्या गायीची तस्करी करणारा टेम्पो भूम ते उस्मानाबाद रस्त्यावर पोलिसांनी पकडला. यामध्ये दाटीवाटीने सहा गायी नेल्या जात होत्या. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) पहाटे 2.25 वाजेच्या दरम्यान करण्यात आली.
भूम पोलिस ठाण्याचे कर्मचारी हवालदार आकाश उंदरे व गणेश देशपांडे दुचाकीवरून पेट्रोलिंग करत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात भेट देऊन पार्डीरोडने बसस्थानकाकडे निघाले. त्यावेळी त्यांना समोरून पार्डीफाट्याकडे जाणारा टेम्पो (क्र. एमएच 12, आरएन 2494) येताना दिसला. चालकाला चौकशी साठी थांबवले असता टेम्पो पुण्याहून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आडसुळवाडी येथे चालला असल्याचे निष्पन्न झाले. या टेम्पोत 6 गायी दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून नेल्या जात होत्या. लांब पल्याचा प्रवास असल्याने त्या गायींना पुरेशी हालचाल करता येत नव्हती. याचवेळी त्या ठिकाणी साहाय्यक पोलिस निरिक्षक मंगेश साळवेही पेट्रोलिंग करत त्या ठिकाणी आले. त्यांनी चौकशी केली असता तसेच त्या वाहनचालकाकडे त्या गायी वाहतुकीबाबत कसलीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. टेम्पोतील वासुदेव बब्रुवान सुरवसे, शांतीनाथ राहुल शिंदे (दोघे रा. आडसुळवाडी) यांच्याकडेही गायी खरेदी केल्याची कागदपत्रे आढळून आले नाहीत. त्यामुळे 8 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या 6 गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या. गाई हाडोंग्री येथील गोशाळेत संभाळण्याकरिता सोडल्या असून टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. वाहनचालक चंद्रकांत हनुमंत भोगले (रा. दरेकरवाडी जि. पुणे) यास अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस निरिक्षक रामेश्वर खणाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हलवालदार एस. डी. घाडगे करत आहेत.