वाशी/प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या मार्फत गांधी विचार संस्कार परीक्षा 2019-2020 संपन्न झाल्या. या  जिल्हास्तरीय परीक्षा मध्ये  छत्रपती शिवाजी विद्यालयातील वैष्णवी लक्ष्मन शिंदे हिने जिल्हयातून प्रथम (गोल्ड मेडल) व कु. तीलहत मुसौवीर काझी हिने द्वीतीय (सिल्वर मेडल) प्राप्त केले.
या सर्व गुणंवत विद्याथ्र्यांचा सन्मान ढोकी येथे  वसंत काळे  महाविद्यालयात  डा.भुजंगराव बोबडे (परीक्षा नियंत्रक जळगाव ), प्रचार्य डॉ.हरिदास फेरे, प्रचार्य वसंत काळे, प्रा. जयश्री कुलकर्णी उस्मानाबाद  यांच्या हस्ते  पार पडला. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक श्री.डी.बी कोकाटे यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले.
 
Top