तुळजापूर/प्रतिनिधी-
 तालुक्यातील खडकी येथील अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्ताने घेण्यत आलेल्या आँनलाईन सेवा शिबीरात ७५ जणांचे विविध कागदपत्रे आँनलाईन काढुन  देण्यात आले
प्रारंभी संस्थेचे सचिव राम जवान यांच्या हस्ते प्रथमता प्रतिमा पुजन करून आँनलाईन सेवा शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीरात गावातील लोकांचे नवीन आधार कार्ड काढणे,आधार कार्ड दुरुस्त करणे, पँन कार्ड काढणे, एसटी पास काढणे, आयुष्यमान कार्ड काढणे यासह वेगवेगळ्या आँनलाईन सुविधा संस्थेच्या वतीने खडकी ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
यावेळी कांताबाई सुरवसे,लताबाई जवान,पोपटबाई साबळे,आण्णा साबळे,संभाजी शिंदे,सिध्दु सुरवसे,आविनाश जवान,राम राम जवान,यशवंत जवान,आकाश जवान,मलिक मुजावर,गणेश जवान,संदेश जवान,मेघराज सुरवसे यांच्या सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top