तुळजापूर /प्रतिनिधी-
शाकंभरी नवरात्र महोत्सव, राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने तुळजापूर शहरात "हास्यधारा"- हास्य कवितांचा उत्सव या हास्य कवीसंमेलनास रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या कवीसंमेलनात राज्यभरातील नामवंत कवींनी भाग घेतला होता.
मराठवाडा सामाजिक संस्था, कलासाधक अकादमी व अक्षरगाथा साहित्य समूह यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. तुळजापूर शहरातील जुनी कन्या प्रशाला मैदानावर संपन्न झालेल्या काव्यसंमेलनात नारायण पुरी यांच्या जांगडगुत्ता या कवितेने रसिकांची मने जिंकली. अरुण म्हात्रे यांच्या स्वामिनी मालिकेच्या शिर्षक गीताला रसिकांनी उदंड प्रतिसाद मिळाला.
अरुण पवार यांच्या वायली राहिली मुलं .. ही आजच्या बदलत्या काळात आई वडिलांची उद्विग्न अवस्था व्यक्त करणारी वाटणी कविता अंतर्मुख करून गेली. सतीश दराडे, दुर्गेश सोनार, शरद धनगर, दास पाटील यांच्या गझलांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुरुषोत्तम सदाफुले, विनायक पवार, अंकुश आरेकर, संकेत म्हात्रे, विनायक पवार, सदाशिव सूर्यवंशी राजेंद्र वाघ, विजय देशमुख यांच्या कविताही रसिकांना मंत्रमुग्ध करून गेल्या.
या कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन कवी भरत दौंडकर यांनी खुमासदार शैलीत करून कार्यक्रमात अधिकच रंगत आणली. या कवीसंमेलनास तुळजापूर शहर व परिसरातील काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे हास्य कवीसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कलासाधक अकादमीचे अध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे, मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर यांच्यासह पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.
या कवीं, गीतकारांनी घेतला भाग
यात कवी, गीतकार अरुण म्हात्रे, जांगडगुत्ता फेम कवी गीतकार नारायण पुरी औरंगाबाद, कवी दुर्गेश सोनार मुंबई, कवी गीतकार विनायक पवार पेण, भरत दौंडकर पुणे, पुरुषोत्तम सदाफुले भोसरी, अरुण पवार परळी वै. सतीश दराडे अकोला, संकेत म्हात्रे मुंबई, राजेंद्र वाघ पुणे, अंकुश आरेकर पुणे, सदाशिव सूर्यवंशी धुळे, शरद धनगर अमळनेर, दास पाटील, विजय देशमुख तुळजापूर यांचा सहभाग होता.