उस्मानाबाद/प्रतिनिधी-
साहित्यामधील नव्या-नव्या वाटा शोधुन, जुन्याचे मार्गदर्शन घेऊन नव्या लोकांना प्रेरणा देणारे, कार्य मराठी साहित्य महामंडळ करीत आहे, अशा प्रकारचे गौरवास्पद उद्गार लेखक, प्रकाशक यांच्या सत्कार प्रसंगी प्रसिध्द साहित्यीक प्राचार्य रा.र.बोराडे यांनी काढले.
९३ व्या मराठी साहित्य संमेलनात रविवार दि.१२ जानेवारी रोजी ज्येष्ठ कथालेखक, प्रा.भास्कर चंदनशिव, प्रसिध्द हिंदी लेखक लक्ष्मनराव नथ्थूजी शिरभाते, शब्दालय प्रकाशनची श्रीमती सुमती लांडे यांचा साहित्यातील भरीव कामगिरीबद्दल प्रा.रा.र.बोराडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी लेखक प्रशासकांचा सत्कार साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यावाह दादा गोरे यांच्या उपस्थित प्राचार्य बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रमेश दापके यांनी केले. तर आभार संजय भरदे यांनी मानले.
मला या क्षेत्रात कधी मर्यांदा आल्या नाहीत -लांडे
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रकाशक श्रीमती सुमती लांडे यांनी नौकरी नाही करायची हे ठरवून या क्षेत्रात मी उतरले. दुसरीकडे नौकरी केली असती तर अधिक पैसा मिळाला असता. परंतू प्रकाशक म्हणून या कामातून जो आनंद, समाधन मिळतो तो पैसापेक्षा जास्त आहे. महिला म्हणून या क्षेत्रात काम करताना,कधीही मर्यांदा आल्या नाहीत, असे त्यंानी सांगितले.
संभ्रम अवस्थेमधुन साहित्यच बाहेर काढेल- चंदनशिवे
आपल्या सत्काराला उत्तर देताना चंदनशिवे म्हणाले की, ज्या भागासाठी लिहिले व ज्याच्यासाठी लिहिले त्यांचा हा सन्मान आहे. संभ्रम अवस्था १२ व्या शतकापासून सुरू झाली आहे. आज ही सर्वत्र  संभ्रम अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये साहित्य हेच  समाजाला बाहेर काढू शकते. १२ व्या शतकात संत साहित्याने प्रबोधन केले. त्यामुळे समाज सुस्थितीत आला. शेतक-यांना आत्महत्यापासुन रोखण्याची ताकद सुध्दा साहित्यामध्ये आहे. समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात जे प्रदुषण झाले आहे ते मुक्त करण्याचे सामर्थ ही शब्दात आहे, असे कथाकार भास्कर चंदनशिवे यांनी सांगितले.
विद्ववान की जरूरत- शिरभाते
शाळेत अनेक विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी होण्याचा स्वप्न आहे, असे सांगतात. परंतू मला मात्र प्रसिध्द लेखक गुलशन नंदा बनायचे होते. अमरावती मधील मिल बंद पडली. अवघ्या ९० रूपयात दिल्ली गाठली. नयी दुनिया, नयी कहाणी या प्रमाणे माझे जीवन सुरू झाले. गावाकडील एका व्यक्तीचे दिल्लीत पाण्यात पडून निधन झाले. त्यावर मी एक कांदबरी लिहिली. ती घेऊन प्रकाशन संस्थेकडे गेलो तेथील लोकांनी माझे कपडे पाहून मला हकलून दिले. तेंव्हापासून मी आजपर्यंत २५ पुस्तके लिहिली आणि प्रसिध्द केली. साहित्यासाठी धनवान की जरूरत नही, विद्ववान की जरूरत है, असे हिंदी लेखक लक्ष्मणराव शिरभाते यांनी सांगितले.
५१ हजाराची मदत
साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी दुपारी मुस्लिम समाजाच्या वतीने ५१ हजार रूपयाची मदत संमेलनासाठी कौतुकराव ठाले-पाटील यांच्याकडे देण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष नितीन तावडे, संजय मंत्री, आशिष मोदाणी,  मुस्लिम समाजातील बाबा मुजावर, जावेद काझी, ईलियास पिरजादे, मसुद शेख, गौस तांबोळी, खलिल कुरेशी आदींची उपस्थिती होती.
 
Top