उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय,जिल्हा पोलीस दल उस्मानाबाद व  वाहतूक नियंत्रण शाखा यां‘या वतीने &1 वा रस्ता सुरक्षा सप्ताह व रा’य सुरक्षा अभियान- 2020 निमित्त वाहतूक नियंत्रण शाखा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात 165 नागरिकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक मा.श्री.राजतिलक रोशन साहेब उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड, सहयाद्री हॉस्पिटल चे दिग्गज दापके साहेब , वाहतूक पोलीस निरीक्षक श्री  धरमसिंग चव्हाण,पोहेकॉ सावरे,पोना एस.एच. सदावर्ते,पो कॉ एस.व्ही. नरवडे, पो कॉ एस.डी. राऊत , पो कॉ एम. जी.गायकवाड,  पो कॉ ए. एल.शिरगिरे आदीं वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचा-याची उपस्थित होती. यावेळी रक्तदान केल्यानंतर वाहतूक शाखेतर्फे हेल्मेट मोफत ही संकल्पना राबवण्यात आली होती " त्याप्रमाणे उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी उस्फूर्त असा सहभाग घेतला होता.

 
Top