उस्मानाबाद /प्रतिनिधी-
परंडा येथील तहसिलदार अनिल हेळकर यांच्यावर वाळूमाफियांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ शासकीय अधिकारी कर्मचा-यांच्या विविध संघटनांच्यावतीने बुधवार दिनांक 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावर 14 डिसेंबर रोजी वाळूमाफियांनी अंगावर ट्रॅक्टर घालून जेवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हेळकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या  घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी संघटना व तलाठी संघटना यांनी 16 डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या घटनेला पाच दिवस झाले असले तरी पोलिसांनी सर्व आरोपींना अद्यापपर्यंत अटक केलेली नाही ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी 18 डिसेंबर रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिका-यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खंदारे, कार्याध्यक्ष मनोज सानप, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सेक्रेटरी आयुब शेख, महसूल कर्मचारी संघटनेचे माधव महेंद्र पाटील, सचिव प्रमोद,चंदनशिवे तलाठी महासंघाचे गोपाळ अकोसकर,एन.डी.नागटिळक, धनंजय हाजगुडे, बाळासाहेब वाघमारे, संतोष माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top