उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 रुईभर येथील ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुवर्णा गव्हाणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर  दि.18 डिसेंबर 2019 रोजी निवडणूक झाली.
 या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे बालाजी कोळगे व काँग्रेसचे प्रमोद कोळगे या दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन उमेदवारात ही निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे बालाजी कोळगे यांना पाच मते तर काँग्रेसचे प्रमोद कोळगे यांना तीन मते पडली. या निवडणुकीत भाजपचे बालाजी कोळगे दोन मताने विजयी झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल तीर्थकर यांनी काम पाहिले.  त्यांना सहाय्यक म्हणून तलाठी एन.आर गुजर व ग्रामसेवक सुदर्शन घोगरे यांनी चोख काम केले.
 यावेळी उपसरपंच व सर्व सदस्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सुभाष दादा कोळग,े पांडुरंग कोळगे, सदाशिव आप्पा कोळगे,  शिवाजी नाना लोमटे, सरपंच दत्ता कस्पटे, रामदास कोळगे,  राजाराम कोळगे,  राजा भनगे, प्राध्यापक जयप्रकाश कोळगे, पंडित जगताप,  किसनराव मते, आगतराव भोयटे, राजकुमार लोमटे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. गुलालाची उधळण करून आतिषबाजी करून विजय साजरा करण्यात आला.

 
Top