उस्मानाबादेत पोलीस पाटील दिनानिमित्त प्रशिक्षण शिबीर संपन्न
उस्मानाबाद /प्रतिनिधी-
प्रशासनातील पोलीस पाटील हे गाव पातळीवरील महत्वाचे  पद आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावात घडलेल्या व घडू पाहणा-या घटनांची माहिती वरिष्ठांना कळविण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांची आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांनी केले.
पोलीस पाटील दिनानिमित्त मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे पोलीस पाटील मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पालवे बोलत होते. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड,  पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलिस पाटील संघटनेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे, प्रदेश संघटक बळवंत काळे , संपर्कप्रमुख दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, महासचिव धनंजय गुंड, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, कार्याध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाकुरे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हरून काझी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणा-या पोलिस पाटलांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, श्रीकृष्ण साळुंके, बळवंत काळे , हरून काझी, हनुमंत देवकते यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रशांत पाटील, मारुती कुंभार, नागनाथ पाटील, अश्विनी वाले, मनिषा जगताप, ज्योतीराम काटे , मधुकर चव्हाण, प्रदीप कदम, सूर्यकांत पाटील, एकनाथ वाघमारे, रमेश गायकवाड, बिभीषण थोरबोले, प्रमोद माळी यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होत.े धनंजय गुंड  यांनी प्रास्ताविक  व सुत्रसंचालन केले. हारूण काझी यांनी आभार मानले.

 
Top