लोहारा/प्रतिनिधी-
 श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जेवळी येथे नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित केलेल्या लोहारा तालुकास्तरीय  क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले.
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित केलेल्या लोहरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा  दि.30/11/ 2019 रोजी लोहारा हायस्कूल लोहारा येथे खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि धावणे या स्पर्धा पार पडल्या. तसेच श्री. बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जेवळी येथे दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडल्या.  तालुक्यातील अनेक खेळाडू बहु संख्येने सहभागी घेतले होते.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय कृमांक काढुन बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक प्राचार्य पी.एस. बिराजदार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.व्ही.कापसे, डी.बी.खडके, जी.एस. सुरवसे, एस.एम. चंडके, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक किशोर होनाजे, ग्रा.प,सदस्य  नागेश पनुरे, अदि, उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी.पोतदार यांनी केले तर आभार एम.वाय. भोसले मानले. या बक्षिससाठी आर्थिक सहकार्य योगीराज शिवानंद सोळसे, नागेश पनुरे, अमोल बिराजदार यांनी केले. श्री. बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जेवळी येथे सर्व यशस्वी संघांना व स्पर्धकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 
Top