नोंदी परत घेण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात
 लोहारा/प्रतिनिधी-
 नगरपंचायतने बेकायदेशीर व पदाचा दुरुपयोग करुन मालकीच्या जागेच्या नोंदी रद्द केल्या आहेत, या नोंदी परत घेण्यात याव्यात, या मागणीसाठी लोहारा शहरातील फेरोज पठाण, अय्याज सवार, यहयाखॉन भोंगळे, नगरसेवक आतीक पठाण, अहेमद भोंगळे, यांनी नगपंचायत कार्यासमोर दि.20 डिसेंबर पासुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
 या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नगरपंचायत कार्यालय येथे आमच्या मालकीची जागेची 8 अ ची नक्कल आणण्यात गेलो असता 8 अ देण्यात आले. परंतु आमच्या 8 अ वर मालकीचे नाव नसल्याने नगरपंचायत कार्यालयात विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले की, दि.4/7/2019 रोजी जिल्हा प्रशासन अधिका-याचे पत्र आलेले आहे. व अध्यक्ष बसवेश्वर मागासवर्गीय गृहनिर्माण सह.संस्था म.लोहारा यांच्या तक्रारी निवेदन देऊन ते आमरण उपोषणास सदर नोंदी रद्द करण्यासाठी बसलेले होते. त्यामुळे सदरील नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले. जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास अधिकारी यांचे पत्र दिले. त्या पत्रावर मिळकत क्रक्रं.4665, 4088 व 4107 या नोंदी रद्द करण्याचा उल्लेख आहे. असे असताना बेकायदेशीर व पदाचा दुरुपयोग करुन आमच्या जागेच्या कसल्याही तक्रारी नसताना व आम्हाला पुर्व कल्पना न देता नोंदी रद्द केलेल्या आहेत. व तसेच दि.27/2/2019 रोजीच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये ही मिळकत क्रक्र 4665, 4088 व 4107 चा मिळकतीचे नोंदी रद्द करणे गरजेचे आहे, असे अहवाल जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना सादर केलेले असताना आमच्या जागेच्या नोंदी का रद्द करण्यात आल्या आहेत. याची तात्काळ चौकशी करुन आमच्या मालकीच्या जागेची 8 अ देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.

 
Top